Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

शाळकरी वारकऱ्यांची बाल दिंडी ..प्राथमिक शिक्षिका श्रीम.शांता मरकड/दहातोंडे यांच्या कवितेतुन….

0 1 4 1 5 6

शाळकरी झाले वारकरी
सोहळा दिंडीचा रंगला
माझ्या शाळेच्या प्रांगणात
रंग भक्तीचा चढला

बोल गोड बोबडे अवीट
विठू नामाचा गजर झाला
रूप पाहुनी गोजिरे इवले
राजा कानडा आनंदला

छोट्या विठूच्या कपाळी
चंदन बुक्क्याचा टिळा
गोजिऱ्या रखुमाई शेजारी
उभा राहिला सावळा

नेसुनी नऊवारी साडी
तुळस घेऊनी डोईवरी
जशा जनाई मुक्ताई
चालल्या पंढरीच्या वारी

टोप्या डोईवर सानुल्यांच्या
भगवी पताका घेतली हाती
खांदा पालखी शोभती
हा सोहळा वर्णू किती

इवल्याच्या हाती टाळ
गळा तुळशीची माळ
जरी पाऊल अडखळे
चाले सोनुले ते बाळ

चैतन्याच्या या लहरीत
गाव भक्तिरसात भिजले
सोहळा हा संस्कृतीचा
रिंगण फुगड्यांचे सजले

दिंडी उपक्रम शाळेचा
निर्मळ निरागस मनाचा
जपू ठेवा संस्कृतीचा
विठू भुकेला भक्तीचा

श्रीम.शांता मरकड/दहातोंडे
प्राथमिक शिक्षिका
चांदा
.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 5 6

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker