Breaking
ब्रेकिंग

ज्ञानेश्वरांच्या भूमीतील ही सेवा सकारात्मक काम करण्यास प्रेरणा देते :उदयन गडाख.

0 1 4 1 8 5

नेवासा (प्रतिनिधी) – 14.7.2023

कामिका एकादशी निमित्त श्री क्षेत्र नेवासा येथे दरवर्षी होणाऱ्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांच्या वतीने नेवासा शहरातील श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसर रस्ता, तुकाराम महाराज मंदिर परिसर, नगरपंचायत चौक, चिंचबन रस्ता आदींची स्वच्छता शुक्रवार दि 14 जुलै 2023 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत युवा नेते उदयन गडाख उपाध्यक्ष यशवंत सामजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या उपस्थितीत यशवंत सामजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, श्री ज्ञानेश्वर
महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी होत नेवासा शहराची स्वच्छता केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मापारी यांनी केले,
याप्रसंगी बोलतांना उदयन गडाख म्हणाले

गेल्या पाच वर्षापासून कामिका एकादशीच्या दुसऱ्या दिवशी यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने यशवंत प्रतिष्ठान कार्यकर्ते व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर व
नेवासा शहर परिसर स्वच्छता करतो यातून मनाला मोठी ऊर्जा मिळते.

ज्ञानेश्वरांच्या भूमीतील ही सेवा सकारात्मक काम करण्यास प्रेरणा देते विद्यार्थी व प्रतिष्ठानचे सदस्य हा उपक्रम दरवर्षी राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
असे उदयन गडाख म्हणाले.

याप्रसंगी
संतोष महाराज चौधरी, नेवासा शहरातील मा नगराध्यक्ष, सर्व मा नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासाचे सर्व विद्यार्थी,प्राचार्या,प्राध्यापक आदींसह शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker