Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

भर दिवसा शेतकर्‍याच्या घरातून 12 तोळे सोने व 6 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याने नेवासा तालुका हादरला…

0 1 4 1 5 0

18.07.2023 प्रतिनिधी (सचिन मस्के ) नेवासा तालुक्यातील गेवराई येथील जवळच असलेल्या शेडमध्ये कांदा भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या घरातून भर दुपारी 12 तोळे सोन्यासह 6 लाख रुपयांची रोख रक्कम घरफोडी करुन चोरुन नेल्याची घटना सोमवारी घडली.
शिवाजी तुकाराम सतरकर (वय 53) गेवराई ता. नेवासा या शेतकऱ्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात सदर घटनेची फिर्याद दिली असून त्यात म्हटले की दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घराची कडी लावून घराजवळ असणार्‍या कांद्याच्या शेडमध्ये कांदा भरण्यासाठी मी, माझी पत्नी व गावातील चार मजूर कामगार असे आम्ही कांदा भरण्याचे काम करीत होतो. दुपारी दीड वाजण्याया सुमारास माझी पत्नी विजया ही पिण्याचे पाणी घेऊन येण्यासाठी घरामध्ये गेली असता तिला घराच्या आतमध्ये लोखंडी कपाटाची उचकापाचक करत असताना एक व्यक्ती दिसला.तिला त्याच्यावर संशय आल्याने माझ्या पत्नीने केला.
मोठ्याने आरडाओरड करत घराच्या बाहेर आल्याने मी घराकडे पळत गेलो तेव्हा मला घराच्या बाहेर एक अनोळखी इसम पळताना दिसला. तेव्हा मी त्यास पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माझ्यासोबत झटापट करुन माझे तावडीतून पळून गेवराई ते कुकाणा जाणार्‍या रोडवर पळून जावून तिथे एक मोटारसायकल जवळ असणार्‍या दोन इसमासोबत मोटारसायकवरुन बसून ते तिघेही पळून गेले.

झटापटीत त्यांच्या ताब्यातील मोबाईल व लोखंडी कटावणी जमिनीवर पडली तेव्हा मी व पत्नी विजया असे आम्ही घरात जावून पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाटातील माझे कांदा पट्टी, किराणा मालाच्या दुकानातील रोख रक्कम व एल.आयसीचा भरणा अशी रोख रक्कम सोन्याचे दागिने असे चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन तोळे वजनाचा सोन्याचा सर व चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, दोन तोळे वजनाची सोन्याची कर्णफुले, एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी, दोन तोळे वजनाचे कानातील वेल असे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 6 लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 764/2023 भारतीय दंड विधान कलम 454, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 5 0

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker