Breaking
ब्रेकिंग

नेवासा बुद्रूक येथे मा.आ.शंकररावजी गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती व ग्रामपंचायत मधील मंजूर विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व गरजू विद्यार्थी, निराधार महिला व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप…

0 1 4 1 8 5

दिनांक १९/०७/२०२३ नेवासा प्रतिनिधी,नेवासा बुद्रूक येथे मा.आ.शंकररावजी गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती व ग्रामपंचायत मधील मंजूर विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व गरजू विद्यार्थी, निराधार महिला व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये पंधरावा वित्त आयोगा मधून रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व घंटागाडी खरेदी करणे,
दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत (अ.जा.व नवबौद्ध घटक वस्ती) मधून रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे. या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
तसेच ४७ दिव्यांग/अपंग बांधवांना कुलर व फॅन वाटप करणे., १२ शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणे., ४ निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

सदर कामे मंजूर झाल्यामुळे तसेच निराधार महिला, शालेय विद्यार्थी व दिव्यांग/अपंग बांधवांना लाभार्थी साहित्य वाटप केल्यामुळे सर्व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत कौतुक केले.
यावेळी परिसरातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रा.सदस्य, तरुण कार्यकर्ते, युवक मित्र, महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker