Breaking
देश-विदेशब्रेकिंग

राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी महामहीम राज्यपाल यांची भेट घेऊन महाराषट्रातील किल्ल्यांची संवर्धन करण्याची केली मागणी …

0 1 4 1 8 5

राज्यात सुमारे ४०० गड-किल्ले असून त्यापैकी १२५ किल्ले हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत संरक्षित आहेत तर उर्वरीत किल्ले हे महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत आहेत. या किल्ल्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांची अत्यंत दूरावस्था झाली आहे. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. आपला दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी या किल्ल्यांचं जतन व संवर्धन होणं आवश्यक आहे. त्यामुळं केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयातून या किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती महामहीम राज्यपाल महोदय रमेशजी बैस साहेब यांना आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनीही यासंदर्भात योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख्या, जगदंबा तलवार या ऐतिहासिक वस्तू तसंच शिंदे-होळकर, गायकवाड या राजघराण्यांशी संबंधित अनेक वस्तू आणि ऐतिहासिक दस्तावेज हे इतर देशांमधील विविध संग्रहालयात आहेत. या वस्तू आणि दस्तावेज हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय असून त्या परत भारतात आणण्यासाठी माझा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु आहे. परंतु यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाची संयुक्त समिती स्थापन केल्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अधिक सोपं होईल. त्यामुळं अशी समिती स्थापन करण्याची आणि याकामी वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंतीही महामहीम राज्यपाल रमेश बैस साहेब यांच्याकडं त्यांनी केली. १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे राज्यात येत असून यावेळी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याची ग्वाही राज्यपाल महोदयांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker