Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

*इर्शाळवाडीतील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मदत करा; सर्वांचे तातडीने पूनर्वसन करा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी*

0 1 4 1 8 5

इर्शाळवाडी दुर्घटना ही जशी नैसर्गिक घटना आहे, तशीच मानवनिर्मितही आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.

इर्शाळवाडी येथील दुर्घटना म्हणजे माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाच्या पर्यावरणाबद्दलच्या सुचनांकडे केलेले दुर्लक्ष याबद्दलची जणू शिक्षाच आहे. हिमालयाच्या कुशीतील जोशीमठ असो की सह्याद्रीच्या कुशीतील इर्शाळवाडी; मोठे रस्ते, एक्स्प्रेस-वे हायब्रीड अन्युएटी रस्ते याबद्दलच्या बेलगाम धोरणाची ही शिक्षा आहे. कंत्राटदारांना वाट्टेल तशी उकरा-उकरी करण्यासाठी मोकाट सोडल्याचा हा परिणाम आहे. यापूर्वी माळीण गावावर असेच संकट कोसळले होते, संपूर्ण माळीन गाव नष्ट झाले होते. यातून कोणताही धडा घेतलेला नाही. अशा घटना टाळण्यासाठी धोकेदायक गावे, वाड्या, वस्त्या यांचे संपूर्ण पुनर्वसन केले पाहिजे.

‘कुठेही पैसा फेका; महसूल अधिकारी विकत घ्या आणि पर्यावरणाची वाट लावा’ असेच धोरण सुरू आहे. विकासाच्या नावाखाली ज्याप्रकारची हडेलहप्पी सत्ताधारी चालवीत आहेत त्याचे सर्वसामान्य बळी ठरत आहेत; खरे तर तथाकथित विकासाच्या नावाखाली केलेले हे मोठे हत्याकांडच आहे. त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून, इर्शाळवाडी गावाचे १०० % पुनर्वसन झालेच पाहिजे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये भरपाई द्यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

अशास्त्रीय व पर्यावरणदृष्ट्या हानिकारक योजनांना प्रतिबंधित करा, या प्रकरणाची चौकशी करून व पर्यावरणीय लेखापरीक्षण करून दोषी अभियंते व अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

*- कॉ. ऍड. सुभाष लांडे*
राज्य सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (C.P.I.)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker