Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

सोनईत सकल जैन समाजाचा ‘त्या’ हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा

0 1 4 1 8 5

२४.०७.२०२३
प्रतिनिधी .सचिन म्हस्के चांदा

कर्नाटक राज्यातील चिकोडी गावातील हिरेकुडी आश्रमात आचार्य श्री कामकुमारनंदीजी गुरुदेव यांचे अपहरण करूण निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभरात सकल जैन समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. या हत्या प्रकरणाचा सीबीआय मार्फत सखोल तपास करावा, हत्येचे नेमके कारण समोर यावे, या हत्येमागील खरा सूत्रधार समोर यावा तसेच आरोपींविरुध्द जलदगती न्यायालयात खटला चालवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत सोनई सकल जैन व हिंदू समाजाने सोनई पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली आहे. सोनई येथील सकल राजस्थानी समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. साधू भगवंत, साध्वीजी भगवंत आठ महिने पायी विहार करतात. रस्त्याने चालताना त्यांना सुरक्षितता मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली . जैन समाज व साधू महाराज शांतताप्रिय व भगवान महावीरांच्या अहिंसेच्या तत्वाचे पालन करणारे आहे. कर्नाटकातील जैन गुरु महाराजांची हत्या तसेच देशभरात जैन तीर्थस्थळांच्या जागांवर कब्जा करणे, तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना जाणीवपूर्वक त्रास देणे, पायी विहार करणाऱ्या जैन साधू भगवंत, साध्वीजी भगवंत यांचे हे अपघात सुरक्षा अशा अनेक घटनांचा उल्लेख श्री मनोज चंगेडिया यांनी आपल्या भाषणात केला. तसेच मूक मोर्चाव्दारे समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker