Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नोंदीत बांधकाम कामगारांना कार्ड वाटप तसेच योजनांची माहिती ग्रामपंचायत चांदा तर्फे देण्यात आली.

0 1 4 1 8 5

प्रतिनधी चांदा २५.०७.२०२३ रोजी चांदा गावातील बांधकाम कामगारांची नोंदणी करून सरकारच्या विविध योजनांचा माहिती ग्रामपंचायत चांदा यांच्यातर्फे दिली व नोंदीत बांधकाम कामगारांना

कार्ड वाटप करण्यात आले, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब आरगडे यांनी पुढील माहिती दिली.
महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना सुरु करते त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगारांना रोजगार, त्यांची सामाजिक सुरक्षा, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य्य, त्यांच्या आरोग्यविषयी सहाय्य्य,आर्थिक सहाय्य्य तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते.

कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे.सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे अशा अनेक बाबींचा या योजनेत सामाविष्ट्य करण्यात आल्या आहेत.

भारतातील बांधकाम कामगार बहुधा समाजातील असुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात, त्यांना कमी वेतन, नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव आणि सामाजिक लाभांपर्यंत मर्यादित प्रवेश यासारख्या असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागते. या समस्या ओळखून, महाराष्ट्र सरकारने या अग्रगण्य योजनेद्वारे बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा आणि विविध फायदे देण्यासाठी एक व्यापक योजना तयार केली.

बांधकाम कामगार योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यभरातील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या मजुरांचे सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

जर आपणास बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल.या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोप्पी आहे माझ्या परिसरातील बांधकाम कामगारांचे अर्ज मी स्वतः भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे अर्ज करण्याची सर्व पद्धत मी तुम्हाला पुढे दिली आहे त्यामुळे तुम्ही आमची ही माहिती शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ मिळवा.

बांधकाम कामगार योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये प्रवेश देऊन सक्षम करणे आहे. तसेच मजूर आणि त्यांच्या कुटुंबांचे राहणीमान सुधारणे, जीवनाचा दर्जा सुधारणे हे आहे.

दैनिक पसायदान कडून वाचकांना विनंती

आम्ही बांधकाम कामगार योजनेची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे. जर तुमच्या आजूबाजूला असे कोणी बांधकाम कामगार असतील तर त्यांना सरकारच्या या बांधकाम कामगार योजनेबद्दल अवश्य सांगा किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


तर सरपंच सूनंदाताई दहातोंडे यांनी बांधकाम कामगारांना खालील माहिती विस्तृत करून सांगितली.

महाराष्ट्र राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबविणे हे बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
बांधकाम कामगारांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचणे आणि त्यांच्याकडून विविध माहिती गोळा करणे.
राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारणे
योजनेच्या लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत अधिक सुलभपणा आणणे.
कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
प्रत्येक बांधकाम कामगाराला नोंदणी क्रमांक देणे.
कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
योजनेअंतर्गत लाभार्थ्यास योजनेचा त्वरित लाभ देणे.
कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया
कामगारांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण
राज्यातील कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे.

या वेळी ग्राम विकास अधिकारी.दादासाहेब आरगडे,ग्रामपंचायत सदस्य .अरुण जावले ( बाजारे) ग्रामपंचायत सदस्य. समद शेख,माजी सरपंच ज्योती जावले,,दिपक जावले,,किरण थोरात,सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker