Breaking
ब्रेकिंग

माळीवाडा बसस्थानक इमारतीसाठी १६कोटी मंजूर..

0 1 4 1 8 5


नगर प्रतिनिधी २५/०७/२०२३. : शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळत आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे माळीवाडा बस स्थानकाच्या नवीन इमरतीसाठी 16 कोटी रुपये निधी आमदार संग्राम जगताप यांनी मंजूर करून आणला.

माळीवाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य स्थानक आहे येथे विविध ठिकाणांहून प्रवासी ये – जा करत असतात. या बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी असून तिची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाऱ्या प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. या माळीवाडा बसस्थानकाची समस्या लक्षात घेवून एक वर्षांपासून या बसस्थानकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आज अखेर त्याला यश मिळाले असून महाराष्ट्र सरकारच्या 2022 – 23 करिता लेखाशीर्ष 6 फ योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाला 523 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी माळीवाडा बसस्थानक इमारतीसाठी 16 कोटी मंजूर झाले आहेत. प्रशासकीय पातळीवर निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागून या इमारतीचे काम सुरु होईल व नगर शहराच्या वैभवात भर घालेल अशी सुसज्ज माळीवाडा बसस्थानकाची नवीन इमारत उभी राहील, अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली.

माळीवाडा बसस्थानकाच्या इमारतीत तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला याचबरोबर पाणी पुरवठा सुविधा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, फायर फायटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहन तळ कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक पार्किंग, कुंपण भिंत आदी सुविधा प्रवाश्यांना उपलब्ध होणार असून नगर शहर महानगराकडे वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker