Breaking
ब्रेकिंग

रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर…

0 1 4 1 8 5

नगर प्रतिनीधी दि.२८/०७/२०२३ : प्रसिद्ध उद्योगपती ‘रतन टाटा’ यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रतन नवल टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी २००० साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker