Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

जेसीबी चोरणा-या टोळीला भिंगार कॅम्प पोलीसांनी ठोकल्या बेड्या 22 लाख रू. चा जेसीबी केला जप्त…

0 1 4 1 8 5

३०.०७.२०२३
प्रतिनिधी अहमदनगर
या विषयी पुढील माहिती अशी की,
दि.26/07/2023 रोजी फिर्यादी नामे किसन हनुमंत कर्डीले वय 52 वर्षे रा. बाणेश्वर मंदीर मागे, बु-हाणनगर ता. जि. अहमदनगर यांचे मालकीचा 22,00,000/- (बावीस लाख रू) किं चा जेसीबी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे फायद्याकरीता चोरून नेला आहे वगैरे म// चे फिर्यादी वरून कॅम्प पो स्टे गु र नं 475/2023 भा द वि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा रजी. दाखल करण्यात आला आहे.

भिंगार कॅम्प पो स्टे चे सपोनि. श्री. दिनकर एस मुंडे सो यांना गोपनिय माहीती मिळाली कि. दि. 26/07/2023 रोजी चोरीस गेलेला जेसीबी हा देढगाव ता.नेवासा जि.अहमदनगर येथे असले बाबत माहीती मिळाल्यावरून कॅम्प पो स्टे चे तपास पथक मधील अंमलदार अशांना सदर ठिकाणी जावून खात्री करून जेसीबी व आरोपी यांना ताब्यात घेऊन कारवाई करावी असा तोंडी आदेश देऊन तपास पथक मधील अंमलदार यांनी देढगाव ता.नेवासा जि.अहमदनगर येथे जावून खात्री केली असता सदर दाखल गुन्ह्यातील जेसीबी हा बेवारस स्थितीत मिळून आला. सदर जेसीबी भिंगार कॅम्प पो स्टे ला जप्त केला. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान व तांत्रीक विश्लेषनाद्वारे अंबादास सोनाजी होंडे व अजित कैलास शेंडगे दोघे रा. पाचुंदा पोस्ट माका ता. नेवासा जि.अहमदनगर यांनी चोरून नेल्याचे निष्पण्ण झाल्याने 1 ) अंबादास सोनाजी होंडे वय 30 वर्षे 2) अजित कैलास शेंडगे वय वय 22 वर्षे दोघे रा. पाचुंदा पोस्ट माका ता. नेवासा जि.अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगीतले कि, आम्ही 1 ) देवीदास शिवाजी वाकडे 2) सागर शिवाजी वाकडे दोघे रा.लिंबे नादूर ता.शेवगाव जि. अहमदनगर याचे सांगणे वरून सदरचा जेसीबी चोरला आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला 22,00,000/- (बावीस लाख रू) चा जेसीबी हस्तगत करण्यात आला असून तो पोलीस स्टेशनला सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे, पोहेकॉ / रेवननाथ दहीफळे, पोहेकॉ / संदिप घोडके, पोना/ गणेश साठे, पोना/दिलीप शिंदे, पोकाँ/अमोल आव्हाड सर्व नेम. कॅम्पपो स्टे, भिंगार, अहमदनगर पोना/राहुल गुंडू नेम दक्षीण मोबाईल सेल, अहमदनगर यांनी सदरची कारवाई केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker