Breaking
क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सातासमुद्रापार महाराष्ट्र पोलिसांचा डंका !

0 1 4 1 8 5

कॅनडामध्ये झालेल्या विश्व पोलीस कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त पै. विजय चौधरी, DySP पै. राहुल आवारे आणि पै. नरसिंग यादव यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. आपल्या कामगिरीने आपण महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

विजय चौधरी

विजय चौधरी यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र केसरी किताब सलग तिन वेळा पटकावला आहे. त्याच बरोबर ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेत त्यांनी दोनवेळा कांस्यपदक मिळवले आहे. ते हिंद केसरी पै. रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे येथे सराव करतात.

राहुल आवारे

राहुल आवारे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, आशियाई कुस्ती स्पर्धेत तीनवेळा कांस्यपदक तसेच वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले आहे. ते सध्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुन अवॉर्डी काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

नरसिंह यादव


नरसिंह यादव यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक तर आशियाई कुस्ती स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली आहे. तसेच त्यांनी वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य मिळवले होते. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाच्या महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पहिल्यांदा सलग तीनवेळा मिळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker