Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; इंडिया फ्रंटच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी पुणे दिनांक १.०८.२०२३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन
व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने
त्यांचा निषेध करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मंडई
येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे
दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा दिल्या जात आहेत. हे
आंदोलन आता सुरू आहे.

मणिपूर येथील हिंसाचार व महिला अत्याचाराच्या घटनांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच संसदेला सामोरे न जाता विरोधकांचा केला जाणारा अनादर यासह केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले. आंदोलनात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) चे सुषमा अंधारे, संजय मोरे व गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर, नितीन पवार, सुभाष वारे, डॉ. अभिजीत वैद्य, विश्वंभर चौधरी, शरद जावडेकर, लुकस केदारी इ. सह संबंधित पक्षांच्या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. निषेध सभा घेऊन मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

एकीकडे मणिपूर जळत असताना पंतप्रधान पुरस्कार कसा घेतात, असा सवाल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह सर्वांनी उपस्थित केला. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन युवा मोर्चा व डाव्या चळवळीतील सी. पी. एम., सी. पी. आय., अंग मेहनती कष्टकरी समिती, सुराज्य सेना, भारत जोडो अभियान, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, बी. आर. एस. पी., सी. पी. आय., एम. एल., युवक क्रांती दल, महात्मा फुले प्रतिष्ठाण, आरोग्य सेना, शिक्षण हक्क सभा, जनता दल युनायटेड, सत्यशोधक आघाडी, निर्भय बनो आंदोलन, जबाब दो आंदोलन, रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या सह इतर अनेक संघटना सहभागी झाल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker