Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

: समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना दुर्घटना, गर्डर बसवणारी क्रेन कोसळली,१४ जणांचा मृत्यू

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी ठाणे ०१.०८.२०२३

ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडून प्राथमिक माहितीनुसार त्या खाली दबून १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून, सदर घटनेत अद्याप पर्यंत १४ व्यक्ती मृत असून, ०३ व्यक्ती जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हा ठेका नवयुगा कंपनीला देण्यात आला होता. उड्डाणपूल ९० ते १२० फुट उंचीचा आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.

दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ०१:०७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहिीनुसार रात्री २३:०० ते ००:०० वाजताच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.

सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत. सदर घटनेत १४ व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ०३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. सदर माहिती ही प्राथमिक माहिती असून, सदर माहिती महसूल सहाय्यक, शहापूर यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker