Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

वडिलांचाच 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडितेनं दिला बाळाला जन्म, छ. संभाजीनगर हादरले

0 1 4 1 8 5

प्रतिनीधी.छत्रपती संभाजीनगर, ०३.०८.२०२३ : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र पित्यानेच आपल्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. मुलीनं बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना समोर आली आहे. शहरातील वाळूज परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी 8 वी च्या वर्गात शिकते, तिला झटके येत असल्याची माहिती वाळूज पोलिसांना देऊन नातेवाईकांनी रुग्णालयात नेले होते. मात्र त्या पीडितेला घाटी रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. घाटीतील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या पोटात 6 महिन्याचा गर्भ असल्याचे उघडकीस आले, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिची प्रसूती केली. बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून ती बोलण्याच्या स्थितीत नाही.

आरोपीला अटक

पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता मुलीच्या सावत्र वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आपणच मुलीवर अत्याचार केल्याची कबुली त्यानं दिली आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker