Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा चे आयोजन..

0 1 4 1 8 5

दिनांक ०४.०८.२०२३


प्रतिनधी चांदा . राहुरी तालुक्यातील उंब्रे या गावात बळजबरीने अल्पवयीन मुलींचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न चालू होता .या प्रकरणात सविस्तर महिती अशी की उंब्रे गावातील खासगी शिकवणी मधील शिक्षिका आपल्या शिकवणी मधील काही मुलींना अतिशय हुशारी ने विशिष्ट धर्मा बाबत कपडे आणि राहणीमान याच्या विषयी माहिती देत असत .

तसेच विशिष्ट धर्मातील मुलांसोबत या मुलींची ओळख करून देत त्यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी प्रवृत्त करत असत.या ओळखीचा गैरफायदा घेऊन ते मुलं या मुलींना आमच्या धर्मात सामील व्हा .. नाहीतर तुमची बदनामी करू अशी धमकी देत होते . संबधित मुलींनी या सर्व प्रकारची माहिती आपल्या घरी सांगितली तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली . या सर्वाचा निषेध म्हणून आणि असे कृत्य पुन्हा घडू नये तसेच

    या सर्वांबाबत हिंदू समाजात जनजागृती व्हावी या साठी सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी येथे दिनांक ०५.०८.२०२३ रोजी सकाळी १० वाजता ,हिंदू जनआक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे .


या मोर्चाला आमदार नितेश राणे स्वतः उपस्थित राहणार असून महाराषट्रातील तमाम सकल हिंदू समाजाने या मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान पै.संदीप लांडे , पै. संकेत चव्हाण तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे .

धर्मांतरण बाबत कडक कायदा करावा अशी हिंदू समाजाच्या वतीने जोरदार मागणी आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker