Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत सोहळा,महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे व शिस्तबद्ध असे नावलौकिक मिळविणारे दल आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 1 4 1 8 5

दिनांक ०५.०८.२०२३ प्रतिनधी नाशिक :महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत सोहळा आज नाशिक येथे पार पडला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात या वेळीं पुढील मुद्दे सांगीतले..

पोलीस दलात सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे व शिस्तबद्ध असे नावलौकिक मिळविणारे दल आहे.जोपर्यंत आपण दलात आहात तोपर्यंत कुठलाही जात, धर्मकिंवा लिंगभेद मानू नये. संवेदनशील शिस्त आवश्यक आहे.न्यायासाठी व मदतीच्या अपेक्षेने येणाऱ्या लोकांना संवेदनशील भावनेने सेवा द्या. दुःखी व्यक्तींचे दुःख समजत आहे, याची जाणीव करून द्या.ध्येयवादी राहून समाजात गुणवत्तापूर्ण बदल करण्याची संधी पोलीस दल देते. पोलीस अधिकारी या नात्याने जनतेशी असलेले ऋणानुबंध अधिक भक्कम करा. जनतेचे मेडल मिळविण्याचे ध्येय उराशी बाळगा.पोलीस दलात कार्यरत असताना प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा, जी शपथ घेतली, ती आठवा व शपथ निभवा.भारतीय संविधान समानता शिकविते. ते लक्षात घेऊन सगळ्या पोलिसांनी वर्तणूक ठेवा.समाज प्रगती करत असताना पोलीस दलासमोर आव्हाने वाढत आहेत. याचा सामना करण्यासाठी स्वतः ला सज्ज व सक्षम बनवा.सामान्य नागरिकांना विश्वास द्या. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी असल्याची जाणीव आपण स्वत: करून घ्या.पुरुष पोलीस अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलात सामील होणाऱ्या महिला पोलिसांचा आभिमान आहे!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker