Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताब्रेकिंग

चांदा येथे नूतन पशू औषधालयाचे उद्घाटन; जनावराचे औषध आता स्वतात मिळणार…

0 1 4 1 8 5

दिनांक ०५.०८.२०२३ प्रतिनधी

नेवासा तालुक्यातील चांदा येथे आज “गोमाता पशू औषधालय या नूतन दालनाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन चे प्रमूख पाहुणे रामायणाचार्य. देविदास महाराज अडभाई त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या वेळीं बोलताना ते म्हणाले भारत हा कृषिप्रधान देश आहे ,आणि त्याला जोडून दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमूख व्यवसाय बनला आहे . तसेच हिंदू धर्मा मद्ये गोधनाला अनन्य साधारण महत्व आहे भगवान श्री कृष्णाचे आणि गोमाते चे खूप जवळचे संबंध आहेत . गायी त्यांना प्रिय होत्या . त्यातच चांदा गावात या नूतन दालनाचे सुरू होण्याने गोमातेची सेवा चांगल्या प्रकारे होणार आहे . त्यात कसलीही कमी नसणार आहे . या दालनाचे मालक श्री .प्रवीण ज्ञानदेव घाडगे आणि श्री निकेत सोन्याबापू जावळे यांना त्यांनी पुढील वाढत्या उद्योगास शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या . या यावेळी उपस्थित माजी. पंचायत समिती सदस्य कारभारी जावळे, माजी. उपसरपंच चांगदेव दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पुंड ,भाजपचे किरण जावळे, तसेच समस्थ गावकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker