Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

करंजीत तीव्र पाणीटंचाई; पंधरा-वीस दिवसांनी नळाला पाणी

ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढण्याचा इशारा

0 1 4 1 8 5

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे गेल्या एक-दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामपंचायतच्या सार्वजनिक नळाला तब्बल १५ ते २० दिवसांनी पाणी येत असल्याने गावातील नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.

गेल्या महिन्यांपासून एक-दोन पावसाने ओढ दिल्यामुळे करंजीत भयाणपाणीटंचाई निर्माण झालेली आहे. मात्र, या पाणीटंचाई संदर्भात कोणीही ब्र शब्द काढण्यास तयार नाही. सत्ताधाऱ्यांनी चार दिवसांत पाणीटंचाई दूर न केल्यास गावातील महिलांसह ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी दिला आहे.

करंजीत भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून, विकतचे पाणी घेण्यासाठीदेखील पाणी विकणारांकडे दोन दोन दिवस अगोदर संपर्क करावा लागत आहे. तर ग्रामपंचायतीच्या नळाला पाणी कधी येईल, याची शाश्वती पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नसते, त्यामुळे पूर्वी आठ दिवसाला सोडले जाणारे पाणी आता मात्र पंधरा-वीस दिवसांनी सोडले जात आहे. करंजीत तीव्र पाणीटंचाई असताना त्यावर शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत सत्ताधारी गटाबरोबरच विरोधकांनी चकार शब्द काढला नाही, अथवा पाणीटंचाई संदर्भात काही उपाययोजना केल्या पाहिजेत , काही ब्र शब्ध नाही काढल्याने पाणीटंचाईवर सत्ताधारी किती संवेदनशिल आहेत हे यावरून दिसून येते. गावात पाणी टंचाई असताना त्यावर मार्ग काढण्याऐवजी अचानक मृद व जलसंधारण समितीवर सचिव निवडण्यासाठी तातडीची ग्रामसभा घेऊन तो विषय हातावेगळा करण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली आहे.मात्र पाणीटंचईमुळे निर्माण झालेला प्रश्नाकडे सर्वांनी सपशेल डोळेझाक केली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker