Breaking
ब्रेकिंग

, “शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत… हर हर महादेव !!!” ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस..

0 1 4 1 8 5

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या सुभेदार
या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासातच हजारो व्ह्यूज मिळाले आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची कथा दाखवण्यात येणार आहे. सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं…” हा डायलॉग ऐकू येतो. सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

‘सुभेदार’ हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. तर चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे.

फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटांमधील अजय पुरकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अजय पुरकर यांच्या ‘सुभेदार’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अजय पुरकर यांनी ‘सुभेदार’ या चित्रपटामधील त्यांच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, “शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत… हर हर महादेव !!!”

चित्रपटाचा ट्रेलर पहा..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker