Breaking
गुन्हेगारी

सोनई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद.

0 1 4 4 1 5

प्रतिनिधी. सचिन म्हस्के.चांदा

घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की
राजु विठ्ठल ब-हाटे , रा. चांदा रोड, घोडेगांव शिवार, ता. नेवासा हे दिनांक 10/08/23 रोजी रात्री कुटूंबियासह झोपलेले असताना घराचे पाठीमागील किचनचा दरवाजा तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहान करुन 1,90,000/- सोन्याचे दागिने रोख व मोबाईल बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले सदर घटने बाबत सोनई पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

. पथक नेवासा, शेवगांव परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना पोनि . दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा आरोपी किरण भोसले रा. एरंडगांव, ता. शेवगांव याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह शेवगांव तालुक्यातील एरंडगांव येथे आलेला आहे आता गेल्यास मिळुन येथील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने लागलीच एरंडगांव, ता. शेवगांव येथे जावुन खात्री करता संशयीत आरोपी मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) किरण जयराम भोसले वय 32, रा. हिंगणगांव, ता. शेवगांव हल्ली 2) राहुल जयराम भोसले वय 20, दोन्ही रा. एरंडगांव, ता. शेवगांव 3) भैय्या चेट काळे वय 20, रा. एरंडगांव, ता. शेवगांव व 4) एक विधीसंघर्षीत बालक असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार नामे 5) सुदास सुदमल काळे रा. गेवराई, ता. नेवासा (फरार), 6) जितीन बाबुलाल ऊर्फ नामदेव चव्हाण रा. पोखरा, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्यांना सोनई पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपी नामे किरण जयराम भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द राहुरी पो.स्टे.गु.र.नं. 716/22 भादविक 379, 34 प्रमाणे चोरीचा तसेच आरोपी राहुल जयराम भोसले हा सराईत गुन्हेगार आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 4 1 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker