Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

स्मारकाच्या कामासाठी आमदार शिंदेंची साथ ‘स्मायलिंग’च्या कामाचे केले कौतूक

दगडी कमान आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे शिल्प चरित्र साकारण्यासाठी आमदार शिंदेंनी घेतला पुढाकार

0 1 4 1 8 5

दिनांक:१२.०८.२०२३
प्रतिनीधी अहमदनगर :
छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या अहमदनगर येथील स्मारकाच्या विकास कामांसाठी धडपडणाऱ्या युवकांना सहकार्य वाढतच आहे. तत्कालीन खासदार छत्रपती संभाजीराजे, नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी निधी दिल्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही या कामासाठी आपल्याकडून निधी देण्याचे आश्वासन शनिवारी दिले. त्यामुळे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती व स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या कामाला आणखी पाठबळ मिळणार आहे.

नगर शहरातील लाल टाकी रोडवर असलेल्या या स्मारकात विकास कामे सुरू आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदार निधीतून येथे अत्याधुनिक अभ्यासिका बांधण्यात येत आहे. त्या कामाचा शुभारंभ शनिवारी आमदार प्रा. राम शिंदे व आमदार संग्राम जगपात यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येत असलेल्या कामाचे कौतूक करून यामध्ये आपलेही भरीव योगदान देणार असल्याचे जाहीर केले. स्मारकाच्या दगडी कमान आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्राला कळवा यासाठी शिल्प चरित्र साकारण्यासाठी भरीव निधी देत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी देखील स्मारकाच्या उभारणीसाठी मलाही योगदान देता आले याचा अभिमान वाटतो असे म्हटले.

यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेशराव कवडे, नगरसेवक डॉ सागर बोरूडे,बाळासाहेब पवार,अमोल गाडे,डॉ अमित पवार, हरिष भांबरे,डॉ अविनाश मोरे,मुन्ना चमडेवाले, गणेश शेंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा मागोवा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत वरकड यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम पांडूळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज भोर,धीरज कुमटकर, विनीत गाडे,सागर घोरपडे, सलमान सय्यद, सुरेश भोर, मयुर ढगे यांनी आठवडाभर परिश्रम घेतले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker