Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस; शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी

0 1 4 1 8 5

अहमदनगर – जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. उत्तर भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणांमध्ये पाणीसाठा चांगला झाला आहे. दक्षिण जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची आणि पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे.

पावसाळ्यास जून महिन्यात सुरुवात झाली. मात्र, दोन महिन्यांत चार नक्षत्रांचा कालावधी संपला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांत सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस आहे. संगमनेर, कोपरगाव, राहाता या तीन तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्म्यापेक्षा थोडा जास्त पाऊस झाला आहे.ज्या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याठिकाणी पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची स्थिती गंभीर आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, बाजरी, कपाशी, सोयाबीन, भुईमूग, वाटाणा या पिकांचे उत्पादन घटणार आहे.मागील वर्षी सरासरीच्या १३०.९ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान निम्म्याने घटल्याचे स्पष्ट झाले असून, त्याचा परिणाम जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे असलेले मुळा धरण दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत भरते.

गेल्या दोन महिन्यांत मुळा धरणात ११ हजार ६९९ दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. यावर्षी ७८ टक्केच भरले आहे. मुळा धरणात नवीन पाण्याची आवकही मंदावलेली आहे. यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत धरण भरण्याचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावरच आशा आहे.मागील वर्षी मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार ६१८ दशलक्ष घनफूट झाला होता, तर मुळा धरण ९१ टक्के भरले होते. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणावर जिल्ह्यातील शेती, औद्योगिकीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात १८१ मिलिमीटर (६८ टक्के) पाऊस झाला आहे.तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)नगर- १९५, पारनेर -१७२, श्रीगोंदे- १८१, कर्जत-१९६, जामखेड-२००, शेवगाव- २१६, पाथर्डी २३७, नेवासे १८५, राहुरी-९४, संगमनेर-१०५, अकोले- २६६, कोपरगाव- १३०, श्रीरामपूर ११३, राहाता- १५९पावसाळ्याचे उरले अवघे ३५ ते ४० दिवसपावसाचा कालावधी जून, जुलै, ऑगस्ट अन् सप्टेबर महिन्याचा असतो. त्यामध्येही प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्यास पुढचा काळ चांगला जातो. त्यानंतर सप्टेबर महिन्यात परतीचा पाऊसही बऱ्यापैकी झाल्यास शेतकरी समाधानाही राहतो.यंदा मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनने समाधानकारक हजेरी लावली नाही. आता पावसाचे ८० दिवस संपले असून, अवघे ३५ ते ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker