Breaking
ई-पेपरब्रेकिंग

पती थाटामाटात दुसरं लग्न करत असल्याचं समजलं, पत्नी मुलाला घेऊन लग्न मंडपात पोहोचली अन्…

लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला.

0 1 4 1 8 5

पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न
देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची वरात थेट पोलीस ठाण्यात नेली. अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला माहिती मिळाली की आपला पती विशाल पवार हा अहमदनगर इथे जाऊन दुसरे लग्न थाटामाटात करत आहे. ही माहिती समजताच पत्नीने आपला बारा वर्षांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले. नगरमध्ये आल्यानंतर संबंधित मंगल कार्यालयाचा पत्ता शोधून बरोबर लग्न लागायच्या आधी काही मिनिटे आपल्या पती समोर पोहोचली आणि तिथून पुढे या लग्नात चांगलाच राडा झाला. पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलेच चोपले. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना सुद्धा काय झाले हे समजत नव्हते. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीने पोलिसांसह लग्नात एन्ट्री मारली.

दरम्यान नववधूचे वडील आणि पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांमध्येही चांगलाच राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत पहिली पत्नी तिचा पती यांना पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला असून कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना सुद्धा आपल्या पतीने दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करुन एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र, त्या ठिकाणी
वेळेत पोहोचल्याने तो लग्न सोहळा थांबवण्यात आला.

पहिल्या पत्नीपासून लग्न लपवण्यासाठी अहमदनगरमध्ये लग्न करण्याचा प्लॅन

पतीने फसवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दलचा गुन्हा अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विशाल गोरखनाथ पवार याच्याविरुद्ध भादंवि कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विशाल पवार हे जालना जिल्ह्यात राहणारे असून त्यांची होणारी नववधू ही सुद्धा जालना जिल्ह्यात राहणारी आहे. मात्र दोघांच्या कुटुंबांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर सोडून अहमदनगर जिल्ह्यात लग्न करण्यामागचे कारण अखेर समोर आले. पहिल्या पत्नीपासून लग्न लपवण्यासाठीच ते अहमदनगरमध्ये करण्याचा प्लॅन दोन्ही कुटुंबांनी आखला होता. मात्र अखेर पहिल्या पत्नीने येऊन पतीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker