Breaking
राजकिय

भाजपाच्या गळाला लागणार ठाकरे गटाचा मोठा नेता, चर्चेला उधाण

0 1 4 1 8 5

गेल्या वर्षभरापासून ठाकरे गटातील पक्ष गळती काही करता थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असताना आता पुन्हा एक मोठा नेता भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याबाबत परिसरात मोठया प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या वर्षभरामध्ये शहर व जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात पक्ष गळती लागल्याचे दिसून येत आहे. ही गळती थांबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काही प्रमाणात प्रयत्न देखील सातत्याने सुरू आहेत. मात्र भाजपा व शिंदे गटाकडून नेहमीच ठाकरे गटातील थोड्याफार प्रमाणात का होईना पक्ष प्रवेश आजही सुरू आहेत.

एकीकडे शिर्डी लोकसभेच्या माजी खासदाराने मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश घेतल्याचा सुखद धक्का ठाकरे गटाला मिळाला असतानाच आता येथून पुन्हा एकदा मोठं व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा समोर येत आहे. याबाबत भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर देखील प्राथमिक बोलणे झाल्याचे समजत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते.

मात्र ठाकरे गटातील हे व्यक्तिमत्त्व नेमके आहे, तरी कोण ? याबाबत दोन्ही गटाकडून कमालीची गुप्तता ठेवण्यात येत आहे. असे असले तरी पक्षप्रवेश सोहळ्याच्या जय्यत तयारीची चाहूल मात्र लागली आहे. याबाबत परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते देखील प्रवेश करणार असल्याचे समजते. पक्षप्रवेश सोहळा येथे की मुंबईत याबाबत देखील मौन बाळगण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker