Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

‘मुळा’च्या आवर्तनादरम्यान सर्व रोहित्रे बंद करणार

शेतकऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

0 1 4 1 8 5

एक सप्टेंबर पासून मुळा उजव्या कालव्यातून सुरू होत असलेल्या शेतीसाठीच्या आवर्तन कालावधी दरम्यान कालव्यानजीकचे सर्व वीज रोहित्र बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबत पत्र लिहून मुळा उजव्या कालव्यातून सुरू होत असलेल्या शेतीसाठीच्या खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तन कालावधीमध्ये कालव्या नजीकचे सर्व वीज रोहित्र बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीला देण्याची शिफारस केली आहे. या पत्रात मुळा पाटबंधारे विभागाने म्हटले की, मुळा प्रकल्पाचे सन २०२३ मधील खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तन १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असून सदर आवर्तन सुमारे ३५ दिवस चालणार आहे.

आवर्तन कालावधीत मुळा पाटबंधारे विभागाने सुमारे २० दिवस कालव्यानजिकचे वीज रोहित्र बंद करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. अगोदरच भारनियनामुळे तसेच पावसाअभावी शेतीतील पिके करपून गेली आहेत. विहीर बोअरमध्ये थोडेफार पाणी आहे – त्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. २० दिवस रोहित्र बंद केले तर आहे ती पिकेसुद्धा वाया जातील. पाणी चोरी होत असेल तर पाण्याची चोरी करणाऱ्याच्या मोटारी जप्त कराव्यात. रोहित्र बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय करू नये. रोहित्र बंद केल्यास शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker