Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लाठीचार्ज’चे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी. मराठा महासंघाचा इशारा

0 1 4 1 8 5

दि.02/09/2023 प्रतिनिधी सचिन म्हस्के चांदा

जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. अंबड) येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्यातील सर्व समाजाची मागणी आहे. मराठा महासंघ आरक्षणासाठी आग्रही आहे. हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन उपोषण कऱणे चुकीचे आहे का, असा प्रश्न मराठा महासंघाने उपस्थित करत मराठा समाजावर काठ्या चालवणे सरकारला महाग पडेल असा इशारा मराठा महासंघाचे राज्य सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिला आहे.
जालन्यातील पोलिसांच्या कारवाईविरोधात मराठा महासंघा(Maratha Mahasangh) कडून राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचे सांगत मराठा समाजावर काठ्या चालवणाऱ्या सरकारला मराठा समाज धडा शिकवेल असा इशाराही मराठा महासंघाकडून देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावे यासाठी शांततेत आंदोलन, उपोषण करणाऱ्या मराठा समाजावर जालन्याच्या अंतरवली इथे बेसुमार लाठीमार करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा मराठा महासंघाकडून निषेध करण्यात आला आहे. लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मोडीत काढण्याचा पोलिसांनी गुरुवारी रात्रीच केला. उपोषण सोडण्यास नकार दिल्यानंतर बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून पोलिस बोलावून अंदोलकावर लाठीमार केला. त्यात अनेक मराठातरुण आंदोलक जखमी झाले आहे. सरकारने हे जाणीवपुर्वक केले असून मराठा समाजाचे आंदोलन आणि आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. मराठा महासंघ याविरोधात सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संभाजीराजे दहातोंडे यांनी घटनेनंतर दिला आहे.
समाजावर काठ्या चालवूनही सरकार ची बाजू कशी चांगली हे सांगत एकप्रकारे त्यांचे समर्थन कऱणाऱ्या सरकारमधील नेत्यांचा मराठा महासंघ धिक्कार करत आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर लाठीमार कऱण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी तर झालीच पाहीजे, मात्र या घटनेला जबाबदार धरुन जालन्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांवर कारवाई करावी.

यासाठी मराठा महासंघ राज्यभर आंदोलन करणार असल्याचे मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, उपाध्यक्ष संतोष नानावटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker