Breaking
ब्रेकिंग

धनगरवाडी येथे बोरवेल मधील मोटारी चोरणारी टोळी सोनई पोलिसाकडून जेरबंद .

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी..सचिन म्हस्के चांदा

. सोन‌ई जवळील धनगरवाडी येथे बोरवेल मधील इलेक्ट्रिक मोटरी चोरणारी टोळी सोनई पोलीसांकडून जेरबंद करण्यात आली यातील तीन आरोपींना दिनांक सातच्या रात्री अटक करण्यात आली यातिन्ही आरोपींना आज नेवासा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले याबाबत सुनील रावसाहेब विरकर यांनी सोन‌ई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती सोन‌ई पोलिसांनी आज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला होता याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की दि 4 रोजी धनगरवाडी येथील गट नंबर 223/1मधील शेतातील बोरवेल मध्ये बसविलेली 1 एच पी अँकर कंपनीची वीस स्टेज सबमर्सिबल मोटर दि 4रोजी सायंकाळी 9वाजता बंद केली होती दि 5 रोजी सकाळी नऊ वाजता चालू करण्यासाठी गेलो असता मोटारीचे पाईप कापून पडलेले दिसले मला मोटार दिसून आली नाही मी व माझ्या मुलाने मोटारीचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती सोनई पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली तपासांती गोरक्षनाथ भाऊसाहेब शिंदे जालिंदर अशोक तागड व सुखदेव रभाजी भाड हे आरोपी निष्पन्न झाले त्यांना अटक करून नेवासा न्यायालया पुढे हजर केले असता न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या आधी सुद्धा धनगरवाडी परिसरातुन अनेक शेतकऱ्यांचे स्टार्टर केबल व कॅनाल वरील मोटरी चोरीला गेलेल्या आहेत मात्र कुणीही तक्रार दाखल केली नसल्याने याचा तपास होत नव्हता आता गुन्हा दाखल झाल्याने याचा शोध लागण्यास मदत होणार आहे सदरची कामगिरी सोन‌ई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तमनर, गोरक्षनाथ जावळे, पवार थोरात, व निखिल तमनर, यांनी ही कामगिरी केली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker