Breaking
ई-पेपरब्रेकिंगसंपादकीय

वाजवी दरात सुंदर आणि आकर्षक गणेश मूर्ती चांदा गावातच उपलब्ध बुकिंग ही सुरू : नवद्योजक ऋषीकेश धुमाळ

मातीला देवपण देऊन जीव भरणारे कलाकार, त्यांच्या कष्टाला आपली साथ हवी.

0 1 4 1 8 3

मातीला देवपण देऊन जीव भरणारे कलाकार, त्यांच्या कष्टाला आपली साथ हवी.

चांदा येथील उच्च शिक्षित बेरोजगार ऋषिकेश धुमाळ हा तरुण आता आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळला आहे .

शिक्षणात झालेले व्यवसायीकरण आणि वाढलेली बेरोजगारी तसेच जे शिक्षण झाले आहे त्या प्रमाणे न मिळणारे मानधन या सगळ्या गोष्टींना कंटाळून ऋषीकेश याने आपला पारंपरिक मूर्ती बनवणे हा व्यवसाय चालू केला आहे . गणेशोत्सव साठी गणेश मूर्ती, दिवाळी साठी लक्ष्मी मूर्ती तसेच मातीचे दिवे, बैलपोळ्याचा सणासाठी बैलजोडी आदी मातीच्या सुबक आणि सुंदर आकर्षक रंगकाम केलेल्या मूर्ती व साहित्य वाजवी दरात उपलब्ध करून देत आहे. त्याच्या या प्रयत्नाला चांगले यश देखील येत आहे . कमी दरात सुंदर आणि आकर्षक मूर्ती गावातच उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. आघाऊ बुकिंग होत आहे. दुसऱ्या कडे रोजगार मागण्या पेक्षा स्वतः रोजगार उपलब्ध करून मूर्ती बनवण्यात आनंद अनुभवत आहे असे त्यांनी सांगीतले. आपल्याला ही कमी दरात आकर्षक मूर्ती हव्या असतील तर आपल्या गावातच उपलब्ध आहे .

“श्रीराम आर्ट” ऋषीकेश आदिनाथ धुमाळ . श्रीदत्त साधक आश्रम शेजारी चांदा , ता. नेवासा, जि. अहमदनगर . मो.क्रमांक .9404131381 येथे संपर्क करून बुकिंग करू शकता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 3

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker