Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी बनावे. – सरपंच सुनंदाताई दहातोंडे .

0 1 4 1 4 9


कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्था अहमदनगर वतीने चांदा येथे बचत गटातील महिलांसाठी असिस्टंट ड्रेस मेकर, ब्युटी केअर असिस्टंट, मेहंदी, रांगोळी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. चांदा येथे सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जन शिक्षण संस्था मार्फत वेगवेगळे कोर्स सुरू करण्यासंदर्भात मीटिंग झाली. महिलांना मार्गदर्शन करताना सरपंच सुनंदाताई म्हणाल्या की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही संकटे येतात, समस्या निर्माण होतात, परंतु त्यावर आपल्याला मार्ग काढून पुढे जायचे असते जन शिक्षण संस्थां अशी एक संस्था आहे त्या मार्फत आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे प्रशिक्षण आपण घेतल्यानंतर आपल्याला घरातील व्यक्तीवर पैशासाठी अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. सर्व मोठे उद्योजक झालेले आहेत त्यांनी सुद्धा सुरुवातीला संघर्ष करूनच आपला व्यवसाय वाढविला आहे. जन शिक्षण संस्थेमार्फत चांद्या तील महिलांना एक संधी निर्माण झालेली आहे. जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .

यावेळी जन शिक्षण संस्थांचे संचालक बाळासाहेब पवार यांनी जन शिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्याचे सविस्तर माहिती दिली. सुनंदा ताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांद्यामध्ये हे प्रशिक्षण होत आहे तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना जिल्हा उद्योग केंद्र मार्फत तसेच प्रधानमंत्री मुद्रा मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. तसेच महिलांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली
यावेळी चांद्याच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनीताताई संभाजीराजे दहातोंडे, जन शिक्षण से कार्यक्रमाधिकारी शफाकत सय्यद उपस्थित होते. जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मधील मुलींसाठी स्वयंरोजगार व्यवसाय प्रशिक्षण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांनी जास्तीत जास्त मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, मुलींनी आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले. संचालक बाळासाहेब पवार यांनी जन शिक्षण संस्थेमार्फत विविध कोर्सचे प्रशिक्षण जिल्ह्यात सुरू आहे त्याचा सविस्तर आढावा घेऊन कॉलेज मुलींनी जास्तीत जास्त या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपण आपल्या भावी वाटचालीस प्रशिक्षणाचा उपयोग करून घ्यावा असे सांगितले. त्यावेळी कॉलेजचे प्राचार्य श्री जावळे सर यांनी या कॉलेजमधील मुलींनी व मुलांना जन शिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येतील असे सांगितले. यावेळी सरपंच सुनंदा ताई दहातोंडे, बाळासाहेब पवार, विद्यालयाचे प्राचार्य श्री जावळे सर, सय्यद सर, श्री भाबड, ससे सर, श्रीमती नवल मॅडम उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 4 9

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker