Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

सोन‌ई ग्रामीण रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या वाड्यावर आरोग्य सेवेचे वाजले तीन तेरा आशा सेविकेचे नेमके काम काय…

0 1 4 1 7 0

प्रतिनिधी सचिन म्हस्के चांदा

नेवासा तालुक्यातील सोनईतील ग्रामीण रुग्णालयातआरोग्य सेवेचे तिन तेरा वाजले आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. डेंग्यू, मलेरिया सारख्या आदी आजाराने डोके वर काढलेले दिसत आहे. मात्र त्याचे आरोग्य विभागाला कुठल्याही प्रकारे सोयरसुतक नाही. सोनई ग्रामीण रुग्णालय सध्या असुन अडचण नसून खोळंबा बनले आहे . या ग्रामीण रुग्णालया अंतर्गत ३८ आशा सेविका आहेत. परंतु त्यांचे काम कसे चालते कधी चालते याची कुठल्याही गावकऱ्यांना कल्पना सुध्दा नाही. पावसाळ्यात डबके साचलेले असतात. त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची घरो घरी जाऊन जन जागृती होणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना कुठे आढळत नाही. सोनई ग्रामीण रुग्णालयात गेले तरी त्या ठिकाणी वेळेवर डाॅक्टर उपलब्ध नसतात. शासनाने ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी शासनाने योग्य मानधनावर या आशा सेविका कार्यान्वित केल्या . परंतु त्यांचा त्यांना विसर पडला की काय अस वाटायला लागले आहे. शासनाने विविध आजारावर मोफत औषधही या आशा मार्फत जनतेला मिळाले पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधे देखील उपलब्ध करून दिली आहे. तरी देखील ते जनतेला वेळेवर मिळत नाही. मग या औषधांचा उपयोग कुणाला व कधी होतो. असा प्रश्न भेडसावत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 7 0

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker