Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रपती उद्या शनी चरणी ! इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शनिदर्शनसाठी, कसा असेल दौरा? काय आहे नियोजन?

0 1 4 1 8 5

राष्ट्रपती उद्या शनी चरणी ! इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शनिदर्शनसाठी, कसा असेल दौरा? काय आहे नियोजन? जाणून घ्या सविस्तर


प्रतिनिधी.सचिन म्हस्के .चांदा

मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गुरुवारी अर्थात उद्या दि.३० रोजी अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्या शनिशिंगणापूर येथे शनी देवांच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाचीतयारी सुरु आहे.

परंतु शनी शिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाचे राष्ट्रपती शनिदर्शनासाठी शनिशिंगणापूरमध्ये येतायेत. राष्ट्रपती आरती, अभिषेक, दर्शन व महाप्रसादही घेणार आहेत.

* या दिग्गजांनी देखील घेतले आहे दर्शन

शनी देवांचा महिमा अगाध आहे. शनिचरणी लाखो भाविक नतमस्तक होत असतात. आता पर्यंत राजकीय दृष्ट्या पाहिले तर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौड़ा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील दर्शनाला आले होते. परंतु कोविंद हे राज्यपाल असताना शिंगणापूरला आले होते. त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. अनेक दिग्गज नेते मंडळी, अभिनेते शनी चरणी नतमस्तक होत असतात.

  • * असा असेल राष्ट्रपतींचा शनिदर्शन दौरा
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी १२.१५ वाजता शिंगणापूरला आगमन होईल. त्यानंतर त्या १२.१५ ते १२. ३५ या वेळेत शनिदेव उदासी महाराज सभामंडपात अभिषेक करतील. त्यानंतर १२.३५ ते १२.४० यावेळेत चौथऱ्यावर शनिदेवास तेल अभिषेक झाला की मग १२.५० ते १.२५ महाप्रसादाचे आयोजन होईल. यावेळी देवस्थानकडून शनिदेव चौथऱ्यासमोर शनिदेव प्रतिमा, शाल व शनिप्रसाद देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला जाईल.
  • * चौथऱ्यावर महिलांना संधी
  • शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी होती. परंतु मध्यंतरी हा मुद्दा गाजला. आंदोलने झाली. त्यानंतर महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास अनुमती देण्यात आली. त्यामुळे आता शनी चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपती दर्शन घेतील.

* ड्रोन कॅमेरा बंदी

या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रपती असे पर्यंत याचा वापर करू नये असे आदेशीत करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker