Breaking
ब्रेकिंग

प्रभू श्री रामचंद्र यांच्या भेटीला रामभक्त निघाला सायकल स्वारीने…

0 1 4 1 8 5

 

चांदा प्रतिनिधी दि.२९/१२/२०२३

चांदा ता.नेवासा जि.अहमदनगर  येथील निखिल मच्छिंद्र (अंकल) दहातोंडे हा रामभक्त युवक रामायणाचार्य देवीदास महाराज आडभाई  यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ३०/१२/२०२३रोजी सकाळी ९.००वाजता अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सायकल ने प्रवास करून जाणार आहे. या साठी त्याला चांदा-नेवासा फाटा-छत्रपती संभाजीनगर-फुलंब्री-सिल्लोड-मुक्ताईनगर-सिलवानी-सागर-बण्डा-शहागढ-गुलकांज-छतरपूर-मलहरा-रायबरेली-जगदीशपुर-मिल्कीपूर- या मार्गाने अयोध्या असा त्याचा प्रवास असणार आहे. त्याचा हा प्रवास सुखरूप होऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्या कडे येणाऱ्या काळात रामराज्य येवो ,सर्व जनता सुखी राहो, कोणावरही अन्याय न होऊ या साठी तो प्रार्थना करणार आहे. त्यानिमित्त चांदा ग्रामस्थांच्या वतीने या युवकाचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.त्यावेळी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे सांगण्यात आले आहे .

2.5/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker