Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशमहाराष्ट्र

व्यावसायिक खाजगी संस्थांनी महाविद्यालयात निवडणूक घेणे बंद करावे. ..

0 1 4 1 6 8

प्रतिनिधी :- अहमदनगर

पूर्वी विद्यापीठ मार्फत विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन निवडणुका पार पाडत असत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नेते निर्माण व्हायचे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढायचे मात्र अलीकडच्या काळात विद्यापीठ मार्फत कोणत्याही निवडणुका सार्वजनिकरीत्या होत नसल्याने विद्यार्थी नेत्यांची पोकळी निर्माण झाली आहे.

 

अशा बाबीचा फायदा अनेक संस्था घेत आहे. प्राचार्य आणि विद्यार्थी यांच्या समवेत संपर्क साधून या महाविद्यालयात जाऊन निवडणुका घेतात. काही खासगी संस्था महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाही पाकीट पुरवतात अशी गुप्त माहिती मिळाली आहे. ज्या खासगी संस्थेचा कोणताही संबंध विद्यापीठ सोबत येत नाही. निव्वळ विद्यार्थ्यांचे सोहळे आयोजित करून स्वतः ची मार्केटिंग करण्याचे काम या संस्था करत आहे. विद्यार्थ्यांकडून सदर संस्थेच्या अनेक तक्रार आमच्या जवळ आल्या असून लवकरच आम्ही खुलासा करणार आहोत. बाहेरील संस्थेच्या निवडणुका पूर्णपणे बंद करून निव्वळ विद्यापीठ मार्फत निवडणुका व्हाव्या या साठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच पुणे विद्यापीठ चे कुलगुरू यांना अर्ज करून मागणी करणार आहोत. हा प्रकार अहमदनगर मध्ये जास्त प्रमाणात होत आहे. अशा महाविद्यालयीन निवडणुका घेण्यात सकाळ माध्यम आयोजित ‘ यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क ‘ ही संस्था अग्रेसर दिसून येत आहे. त्यांच्या समवेत चर्चा ही करणार आहोत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते कमलेश नवले आणि लेखक जैद शेख ( नेवासकर ) यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 6 8

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker