Breaking
क्रिडा व मनोरंजन

चांदा गावात बऱ्याच दिवसा नंतर सर्कस ; सर्कस मालकाचे गावकऱ्यांना मदतीचे आव्हान…

0 1 4 1 8 5

चांदा प्रतिनिधी -: गावात दिनांक २८ डिसेंबर २०२३ पासून ३० डिसेंबर २०२३ पर्यंत सायकल सर्कस चालु आहे. या साहसी आणि विनोदी खेळाचा सर्वच गावकरी मनमुराद आनंद घेत आहेत. बऱ्याच वर्षापासून चांदा गावात सर्कस आली नव्हती आणि आता आली आहे तर गावकरी त्याचा आनंद घेत आहे . या सर्कस चे दोन दिवसापासून प्रयोग चालू आहे.उद्या शेवटचा प्रयोग असणार तरी सर्व गावकऱ्यांनी शांततेत या प्रयोगाचा आनंद घ्यावा असा आयोजक मार्फत सांगण्यात आले आहे. तरी सर्कस सारखे विनोदी आणि साहसी खेळ टिकावे या साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

लहानमु लांपासून ते मोठ्यांपर्यंत आकर्षण आणि करमणुकीचा खेळ असलेल्या सर्कसमधील प्रयोग आता हळूहळू बंद होत आहेत. यामुळे संपूर्ण सर्कसच आता बंद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. सर्कस म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात धाडसी खेळाचे प्रयोग. सर्कसमधील जोकरच्या करामती. लहान मोठ्यांचं मनोरंजन करणारी हीच सर्कस आता शेवटच्या घटका मोजत आहे. कारण सर्कशीला मिळणारा प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद आणि त्यामुळे मिळणाऱ्या कमी पैशामुळे सर्कशीतून कमी होत असलेले कलाकार. या कारणांमुळे सर्कस मालकांना सर्कसच बंद करण्याची वेळ आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker