Breaking
ब्रेकिंग

स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारी माऊली सावित्रीबाई फुले यांची आज जयंती! पैस इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये पसायदान सामजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली…

हक्कासाठी लढताना कर्तव्याची जाणीव ठेवून कर्तृत्त्व गाजवणाऱ्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना वंदन!

0 1 4 1 8 5

प्रतिनधि चांदा :- पैस इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये पसायदान सामजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.  सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.पूनम दारकुंडे  या प्रमुख पाहुण्या होत्या . त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.  त्यानंतर शाळेच्या शिक्षिका कुळसकर मॅडम आणि बोरुडे  मॅडम यांचा सत्कार पाहुण्यांचा हस्ते करण्यात आला.  पसायदान सामजिक प्रतिष्ठान तर्फे लहान मुलांना खाऊ आणि पेनाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पसायदान समजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल दहातोंडे , सेक्रेटरी सागर दिवटे विद्यार्थी पालक निकेत जावळे कॉ.कार्तिक पासलकर आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्तिदिन म्हणून साजरी केली जाते. मात्र अलीकडच्या काळात स्वातंत्र स्वैराचारात बदलताना दिसत आहे, हा त्या माऊलीचा अपमान नव्हे काय? महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्या माउलीने किती खस्ता खाल्ल्या त्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊ. 

‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी! प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांचा १० मार्च रोजी स्मृतिदिन आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker