Breaking
ब्रेकिंग

खेडले परमानंद चांदा परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ धास्तावले.

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी ..सचिन म्हस्के चांदा

चांदा,खेडले परमानंद परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली असून गावालगत लोक वस्ती मध्ये घुसून बिबट्या दहशत करत आहे.

 

         परिसरात अनेक कुत्रे ,शेळ्यांचा फडश्या दैनिक स्वरूपात पाडला जात असून 10 जानेवारीच्या रात्री फय्युम इनामदार यांच्या राहत्या घराजवळील शेड मधून जाळीची तटबंदी असतानाही एक शेळीचा जागेवर फरशा पाडला तर दुसरी ओढून नेल्याचा प्रकार घडला आहे.

 

तर दुसरी घटना ही चांदा गावातील महेश रावसाहेब (नाना ) दहातोंडे यांचा दारातून (रॉटविलर ) जातीचा कुत्रा जागीच फस्त केला 

 

 

        यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून वन खात्याकडून पंचनामा सोडून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.

 

       संबंधित घटनेची दखल घेऊन दोन्ही ठिकाणी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

        शालेय विद्यार्थी शेती काम करणारे शेतकरी,शेतमजूर अशा वाढता संचार धोकेदायक ठरत आहे या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker