Breaking
संपादकीय

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशीच का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन?  

0 1 4 1 6 8

 

 

 

 

प्रतिनिधी .. सचिन म्हस्के चांदा. 

भारतात दरवर्षी १२ जानेवारीला ‘राष्ट्रीय युवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर, १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. ही परंपरा आजतागायत कायम आहे. आजच्या दिवशी देशात सर्वत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि युवा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

 

हा दिवस साजरा करण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे आजच्या तरूणाईमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांबदद्लचे महत्व वाढवणे हा आहे.

 

१२ जानेवारीलाच का साजरा केला जातो युवा दिन?

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि त्यांचे जीवन यांमधून तरूणांना प्रेरणा मिळते. मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानून स्वामी विवेकानंद यांनी तरूणांसाठी भरीव कार्य केले होते. स्वामी विवेकानंद हे धर्म, इतिहास, तत्वज्ञान, कला, साहित्य आणि सामाजिक शास्त्रातील तज्ज्ञ होते.

 

स्वामी विवेकानंद यांना भारतीय शास्त्रीय संगीताची विशेष आवड होती. त्यांचे विचार आणि कार्य आज ही तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. विवेकानंद यांचे हे अनमोल विचार आणि त्यांचे जीवन तरूणांना नेहमीच प्रोत्साहन देते.

 

स्वामी विवेकानंद यांचे हे अनमोल विचार आणि कार्य तरूणाईमध्ये असेच जागृत रहावेत, यासाठीच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी म्हणजे १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

 

राष्ट्रीय युवा दिनाचे खास महत्व

देशाचे भविष्य हे तरूणाईवर अवलंबून आहे. उद्याचा विकसित भारत हा तरूणांच्या हाती आहे, असे नेहमी म्हटले जाते आणि हे खरे देखील आहे. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशातील तरूणाईचे योगदान असते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तरूणांना योग्य मार्गदर्शन मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे, या राष्ट्रीय युवा दिनाचे खास असे महत्व आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 6 8

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker