Breaking
ब्रेकिंग

नगरमधील तहसीलदार निलंबित; अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात अनियमिततेचा ठपका…

0 1 4 1 8 5

 

प्रतिनिधी .राहुरी

राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे अवर सचिव संजीव राणे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले. मालेगाव (जि. नाशिक) येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांच्या अनुदान वितरणात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

चंद्रजीत राजपूत हे मालेगावमध्ये २०२० मध्ये कार्यरत होते. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या अनुदान वाटपात अनियमिततेचा आरोप होता. त्याची चौकशी सुरू होती. यात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. या कारवाईमुळे नगर जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

चंद्रजीत राजपूत यांची मालेगावमधून नगर जिल्ह्यात एप्रिल २०२३ मध्ये बदली झाली होती. मालेगावमध्ये काम करताना त्यांनी मंत्री, आमदार, माजी आमदार आणि विविध संघटनांच्या रोषाला समोरे जावे लागले होते. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या एस.जे.शुगर कारखान्याविरुद्ध थकीत एफआरपीपोटी कारवाई केली होती. या कारवाईत त्यांनी 24 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल सील केला होता. या कारवाईने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती.

 

मालेगावमध्ये मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमासांठी ३३१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली होती. यातील 73 बीएलओंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईचा बडगा चंद्रजीत राजपूत यांनी उगारला होता. यानंतर त्यांची बदली नगर जिल्ह्यात झाली.

राहुरी तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी तनपुरे सहकारी कारखाना जमीन घोटाळ्यात चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष आणि तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या नेहमीच संघर्ष राहिला. प्रहार जनशक्तीचे पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी तहसीलदार राजपूत यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या.

 

तहसीलदार राजपूर यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याबरोबर त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.निलंबनाच्या काळात त्यांना नगर जिल्हाधिकारी मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश करण्यात आला आहे. त्यांना मुख्यालय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय सोडता येणार नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker