Breaking
कृषीवार्ता

सोनई कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारला चांदा गावचा नकाशा….

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी सचिन म्हस्के 

चांदा येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी – औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत अभिजीत म्हसे, यश बोरकर, तुषार विटनोर, पुष्कर उज्जेवाड, आशुतोष वामन व मुकूंद शिंदे यांनी ग्रामस्थांना सहभागी ग्रामीण मूल्यांकनाचे (Participatory Rural Appraisal) प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

     सहभागी ग्रामीण मूल्यांकन (पीआरए) हा गैर-सरकारी संस्था (एनजीओ) आणि आंतरराष्ट्रीय विकासामध्ये गुंतलेल्या इतर संस्थांद्वारे वापरला जाणारा दृष्टिकोन आहे. विकास प्रकल्प आणि कार्यक्रमांच्या नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये ग्रामीण लोकांचे ज्ञान आणि मते समाविष्ट करणे हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे.

     या वेळी कृषिदुतांनी गावाचा नकाशा रांगोळीच्या साह्याने दाखवण्याचा प्रयत्न केला व याद्वारे गावातील ग्रामपंचायत, रस्ते, मंदिरे, मज्जीद, चर्च, दवाखाने, बस स्थानक व इतर बाबी दर्शवल्या गेल्या होत्या.

     यासाठी प्राचार्य डॉ. एच.जी. मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे.एम.वाघमारे व इतर विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.तसेच यावेळी चांदा गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker