Breaking
ब्रेकिंग

चांदा येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन….

0 1 4 1 8 5
  •  गणेश जयंती निमित्ताने चांद्यातील श्रीगणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
    फेब्रुवारी ०६, २०२४
    चांदा सचिन म्हस्के प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील चांदा येथे येत्या मंगळवारी येणाऱ्या गणेशजयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रथमच चांद्यातील गणेश मंदिरात गणेश भक्तांना गणेश जयंती च्या वेळी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

  1. रविवार दिनांक ११/०२/२०२४रोजी सकाळी ९.००वा.देवगड संस्थान चे उत्तराधिकारी  महंत प पु.गुरवर्य स्वामी प्रकाशनंदजी महाराज यांची सदिच्छा भेट….

चांदा येथील जि. प. प्राथमिक शाळेजवळ भव्य गणेश मंदिर आहे. या ठिकाणी प्रत्येक गणेश चतुर्थीला महाआरती व महाप्रसाद पार पडत असतो. येथील लक्ष्मी मित्र मंडळाने यावर्षीपासून श्रीगणेश जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार उद्या गुरुवार दिनांक ८ पासून ते बुधवार दिनांक १४ पर्यंत श्रीगणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व त्यानंतर सायंकाळी सात ते नऊ जाहीर हरी किर्तन असे विविध कार्यक्रम या निमित्ताने होत आहेत. किर्तनामध्ये अनुक्रमे हरिभक्तिपारायण सौ. तेजस्विनीताई नवले, गुरुवर्य महंत ह भ प आदिनाथ महाराज शास्त्री, ह भ प महंत रमेशानंदगिरी महाराज, ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री, ह भ प राम महाराज खरवंडीकर, ह भ प रामायणाचार्य देविदासजी महाराज आडभाई यांचे जाहीर हरिकीर्तन सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे. तर गणेश जयंतीच्या दिवशी मंगळवार दिनांक 13 रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत श्रीगणेश जयंती निमित्ताने नगर प्रदक्षिणा होईल. बुधवार दिनांक 14 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प कारभारी महाराज झरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवामध्ये रोज सायंकाळी महाप्रसाद होणार असून बुधवारी सकाळी काल्याच्या कीर्तनानंतरही महाप्रसाद वाटप केले जाणार आहे .या कार्यक्रमाची तयारी लक्ष्मी मित्र मंडळ, गणेश मंदिर परिसर, तसेच चांदा ग्रामस्थांच्या वतीने सुरू असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker