Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

घोडेगाव बनले अवैद्य धंद्याचे माहेरघर घोडेगाव आऊट पोस्टचा कारभार झिरो पोलिसाच्या हाती पोलिसांचे दुर्लक्ष…

0 1 4 1 8 4

 

 

  प्रतिनिधी सचिन म्हस्के चांदा–.

 नेवासा तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या बाजार साठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव सध्या पोलीस आऊट पोस्टचा कारभार झिरो पोलीसच्या हाती आल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. घोडेगाव हे संभाजीनगर अहमदनगर महामार्गावर असून इथून दोन मोठ्या शहराला जोडणाऱा महामार्ग जात असल्याने येथून अवैद्य प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. या अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचा देखील ताबा घेतल्याने एसटी बसला इथून प्रवासी मिळणे मुश्किल झाले आहे. हे होत असताना संबंधित पोलीस तोंडावर बोट हातावर घडी घालून सर्व कारभार पाहत आहे .तसं पाहिल्यास घोडेगाव आऊट पोस्ट कारभार हा झिरो पोलिसांच्या हाती असून पोलीस अंगात डगला घालून शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे पोलिसाचे अस्तित्व संपते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .येथील जनावराच्या कांदा मार्केट मधून करोडो रुपयाची उलाढाल होत असल्याने त्या मानाने येथील जुगार अड्डे जोमाने सुरू आहेत येथे जुगार खेळण्यासाठी मराठवाडा विभागातून जुगारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मटक्याच्या धंद्यातून लाखो रुपयाची उलाढाल दर दिवसाला होत आहे मात्र याच्यावर ही धंदे बंद करण्याची जबाबदारी आहे ते मात्र बघायची भूमिका निभावताना दिसतात घोडेगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून इथून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर चालते येथे गुन्हा करून गुन्हेगार सहजपणे मराठवाडा भागात पळून जाऊ शकतो. मध्यंतरीच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी करत एकाच आठवड्यात दोन वेळेस गावठी कट्टे वापरणाऱ्यांवर कारवाई केली. परंतु स्थानिक पोलिसांना याची साधी खबर देखील नाही. घोडेगाव हे महामार्गावर येत असल्याने राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेले कांदा मार्केट येथे आहे . या ठिकाणी मोठी उलाढाल होत असल्याने सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. मात्र गुन्हेगारीवर पोलिसांचा कुठलाच वचक राहिलेला दिसून येत नाही सुगंधी तंबाखू मावा गुटखा याचे इथून मोठे रॅकेट चालते येथे पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्याने गावठी दारू देशी दारू विक्रेते टपऱ्यावर किंवा धाब्यावर सहज उपलब्ध होते .रात्रीच्या वेळेस या महामार्गावरील धाब्यावर वेश्याव्यवसाय चालतो याबाबत पोलिसांना प्रत्येक वेळा निवेदन देऊन सुद्धा यावर ठोस अशी कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे धंदे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत महामार्गावरील स्टीलच्या गाड्यां लुटण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असून याचा छडा लागणे महत्त्वाचे आहे अन्यथा पोलिसावरचा विश्वास उडत आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांला जबाबदार धरून कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 4

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker