Breaking
ब्रेकिंग

चांदा येथील जलजीवन पाणी योजनेचे काम करताना गावातील रस्ते फोडण्याचे काम ठेकेदारा कडून होताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.

0 1 4 1 8 5

 

प्रतिनिधी .सचिन म्हस्के चांदा

नेवासा तालुक्यातील चांदा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरू असून हे करत असताना संबंधित ठेकेदाराकडून गावातील रस्ते फोडण्याचे काम सुरू आहे मात्र संबंधित ठेकेदार व जलजीवन चे अधिकारी यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते ही योजना केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार मिळून 21 कोटी रुपयांची ही योजना असून त्यात पाण्याचा तलाव जलकुंभ आदी कामे प्रस्तावित आहेत जलजीवन योजना ही ठेकेदार कंपनीसाठी कुरणच ठरताना दिसत आहे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने सदर योजनेचे काम करत असून प्लॅन इस्टिमेट प्रमाणे कामे होताना दिसत आहे सदर जल जीवन योजनेवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने सदर कामे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने व निकृष्ट दर्जाची करत असल्याने ही कामे ज्यादा दिवस टिकतील की नाही ही शंका उपस्थित केली जात आहे सरकार कोट्यावधी रुपये यावर खर्च करत असून त्यामानाने ही कामे होताना दिसत नाही चांगले रस्ते फोडून ठेकेदार यातून काय साध्य करणार आहे हे समजत नाही ठेकेदाराला हे रस्ते फोडण्याचे अधिकार कोणी दिले हा संशोधनाचा विषय आहे शासनाने जीवन योजनेसाठी भरपूर प्रमाणात निधी दिला असून या निधीचा योग्य प्रकारे वापर होतो की नाही हे बघण्याचे ाम अधिकार्‍यांचे असताना देखील संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत त्यामुळे ठेकेदार लोकांच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे चांदा जलजीवन योजनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker