Breaking
ब्रेकिंग

महावितरणची वीजतोड मोहीम कारवाई विरोधात अधिक्षक अभियंता कार्यालयावर रुम्हणे मोर्चा काढणार…: दहातोंडे

0 1 4 1 8 5

प्रतिनिधी सचिन म्हस्के चांदा

नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना व नागरिकांना पाणीटंचाई सारख्या समस्येला तोंड द्यावे लागत असतानाच महावितरण विभागाची मनमानी सुरू झाली आहे. वीजविले थकल्याची कारणे सांगत महावितरणचे शेतकऱ्यांसह अधिकारी ग्रामपंचायतीच्या विजेची तोडणी करीत आहेत. याबाबत आता मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी अहमदनगर येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर रूमणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

 

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे पाणीटंचाई सारख्या गंभीर समस्येला

 

लोकांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय उन्हाळी पिकांनाही पाणी देण्याची समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने नगर जिल्ह्यातील ९६ मंडळात दुष्काळी

 

परिस्थिती जाहीर केलेली असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नये, यासह दुष्काळी उपाय- योजना प्राधान्याने राबविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात महावितरणकडून आदेशाला केराची टोपली दाखवीत अधिकारी व कर्मचारी मनमानी करीत आहेत. विजेचे बिल थकलेल्या

शेतकऱ्यांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या विजेची तोडणी करीत असल्यामुळे शेतकरी आणि ग्रामपंचायतीसमोर पाणीटंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांपूढे निर्माण झाला आहे. याबाबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी महावितरण विभागाने मनमानी थांबवली नाही तर, अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर आठ दिवसात रूमने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker