Breaking
गुन्हेगारी

अवैध व्यावसायीकांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

अवैध व्यावसायीकांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

0 1 4 1 8 5


प्रतिनिधी. सचिन म्हस्के चांदा

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व्यवसायीकांविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात ७८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

 

एकूण १२ लाख ६० हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ ते २९ मार्च दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

कोतवाली, भिंगार, सुपा, नगर तालुका, एमआयडीसी, श्रीगोंदा, शेवगाव, सोनई, शनिशिंगणापूर, राहुरी, कोपरगाव, राहाता व संगमनेर शहरात अवैध दारू विक्री व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण ५२ जणांचा समावेश आहे. ९ लाख ७७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ६० आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध जुगार प्रकरणी तोफखाना,

संगमनेर शहर, संगमनेर तालुका, भिंगार कॅम्प, सुपा, शेवगाव व सोनई पोलिस ठाण्यात १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ लाख ८२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तब्बल १८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 8 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker