Breaking
गुन्हेगारी

अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई,11,37,961/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 100 आरोपी ताब्यात.स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई,11,37,961/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 100 आरोपी ताब्यात.स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

0 1 4 1 5 1

अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई,11,37,961/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 100 आरोपी ताब्यात.स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने राकेश ओला , पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि . दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

 

नमुद आदेशाप्रमाणे पो .नि . दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतुक करणा-या इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिनांक 30/03/2024 ते दिनांक 02/04/2024 या कालावधीमध्ये एकुण 95 गुन्हे दाखल करुन 100 आरोपींचे ताब्यातुन 11,37,961/- रुपये किमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे .

सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर व प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 1 5 1

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker