Breaking
कृषीवार्ता

कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात लागवडीपूर्वीच बियाण्याचा काळाबाजार

कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात लागवडीपूर्वीच बियाण्याचा काळाबाजार

0 1 4 4 1 5

 

 

 

प्रतिनिधी.  सचिन म्हस्के चांदा

नेवासा व शेजारील तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कपाशीच्या बियाणांच्या काळा बाजार सुरू त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून लागवडी पूर्वीच बियाणांचा काळाबाजार सुरू झाला असल्याने कृषी विभागाने यात लक्ष घालून बियाणांचा काळाबाजार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे .

 

मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी याबाबत कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बाजारात कपाशीचे चांगल्या प्रतीचे वाण उपलब्ध नसल्या कारणाने व पावसाचे वातावरण तयार झालेले असल्यामुळे शेतकऱ्याची कपाशी लागवडीची लगबग सुरू झालेली आहे जमिनीची मशागत पूर्ण झालेली असून बळीराजाला पावसाची ओढ लागलेली आहे .

 

पाऊस झाल्याबरोबर कपाशीची लागवड करता येईल या आशेने शेतकरी मिळेल त्या भावाने कपाशीचे बियाणे खरेदी करत आहे .त्याचाच फायदा काही व्यापारी मंडळीकडून उचलला जात आहे किमान एका पॅकेट साठी शासनाने सरासरी ठरलेल्या भावापेक्षा किमान 800 ते 900 रुपये म्हणजे दुपटीच्या भावात शेतकऱ्याला ही बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे तरी संबंधित गोष्टीची नोंद घेऊन कृषी विभागाने त्वरित याला आळा घालण्याची नितांत गरज आहे पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना सर्व व्हरायटीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे आणि जर हे बियाणे उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना ते काळयाबाजाराने विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही व काळाबाजाराने खरेदी केलेले बियाने ओरिजनल असेल असे कशावरून त्यामुळे शेतकऱ्यांनी ही बियाणे खरेदी करताना शक्यतो काळाबाजाराने बियाणे खरेदी करू नये असे

 

 

आवाहन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संभाजी शिंदे यांनी म्हटले आहे या गोष्टीकडे नगरचे जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित काळाबाजार करणाऱ्यावर तातडीने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कडून दंड आकारण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे .

 

गोलमाल है सब गोलमाल है शेतकरी कंगाल है !

 

तो कालाबाजार वाला मालामाल है !

 

दर सिझनमध्ये ठराविक व्यापाऱ्यांकडून असले प्रकार घडत असल्याने संबंधित विभागाने या व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्याची आवश्यकता आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 4 1 5

दैनिक पसायदान

लोकशाहीचे मूळ भारतीय संविधान , सर्वसामान्यांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपण येत्याकाळात जनता म्हणून सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे. वाचकांसाठी :-वाचकांनी बातमीची सत्यता पडताळून पहावी काही चुकीची बातमी असेल तर आम्ही टीम दैनिक पसायदान तिची शहानिशा करू .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker